नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड/प्रतिनिधी – बिहार,मध्यप्रदेश अशा परराज्यातून पिस्टलची तस्करी करून महाराष्ट्रात विक्री करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात नांदेड पोलिसांना यश आले आहे.परराज्यातून पिस्टल आणून नांदेड शहरात त्याची विक्री करण्याचे काम ही टोळी करत होती.
नांदेड स्थानिक गुन्हे शाखा पथकाने शहरातील आरटीओ कार्यालयात काही इसम गावठी पिस्तुल खरेदी विक्री साठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला.त्यात चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस आरोपींना अटक करण्याच्या तयारीत असतानाच या चारही आरोपींनी पोलीसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी चारही इसमांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.
आशु पाटील, बलबिरसिंघ प्रतापसिंघ जाधव, शेख शाहबाज शेख शकील, शामसिंघ ऊर्फ शाम्या मठवाले असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.सर्व आरोपी हे नांदेड येथील असून पंचविशीतल्या आतील तरुण आहेत. या आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांच्या कडून सात गावठी पिस्तुल व 116 जिवंत काडतुसे असा मोठा शस्त्र साठा याच्या कडून हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी माध्यमांना दिली.