DESK MARATHI NEWS ONLINE.
छ.संभाजीनगर/प्रतिनिधी – नक्षलवादयांना ज्यांच्या नावाने घाम फुटतो असे आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांची आज नव्या शहरात बदली करण्यात आली. विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) आयपीएस (Ips) अधिकारी संदीप पाटील यांच्याकडे शहर पोलिस आयुक्तपदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून संदिप पाटील यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. सध्या नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख असलेले संदिप पाटील नागपूरमधून कारभार सांभाळतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांची विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे.
सांगली जिल्ह्यात जन्मलेल्या संदिप पाटील (Sandeep patil) यांचे साताऱ्याच्या सैनिकी स्कूलमध्ये शिक्षण झाले. इस्लामपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन त्यांनी दिल्लीत यूपीएससीची तयारी केली. त्यांची पहिली पोस्टिंग चंद्रपूर येथे झाली. त्यानंतर खामगाव, गडचिरोली, सातारा, पुणे ग्रामीण येथे उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी तब्बल 174 नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करायला लावून त्यांना मुख्य प्रवाहात आणले होते. संदिप पाटील यांनी आज पदभार स्वीकारताना सांगितले की लोकांच्या मनामध्ये पोलिसांबद्दल भावना निर्माण करणे महत्त्वाचे आहे. समाजाला व उद्योग जगतामध्ये चांगली चालना मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. शहरातील गुन्हेगारीवर नजर ठेवून त्याचा खात्मा करा. येणाऱ्या 4 तारखेला निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या बैठका सुरू असून त्याची माहिती घेणे सुरू असल्याचे सांगितले आहे.