नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
ठाणे/प्रतिनिधी – पाचव्या टप्यातील उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. 25 ठाणे (Thane) लोकसभा मतदारसंघासाठी आज विविध पक्षांच्या तीन उमेदवारांनी तर दोन अपक्ष उमेदवाराने आपले नामनिर्देशन अर्ज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे उमेदवारी सादर केले. यात शिवसेना (शिंदे गट)-4, भारत महापरिवार पार्टी-1, वंचित बहुजन आघाडी- 3, बहुजन समाज पार्टी – 2, भिमसेना- 1, अपक्ष -1 या उमेदवारांचे दुपारी तीन वाजेपर्यंत पूढील 12 नामनिर्देशन पत्रांचे वाटप केले.
आज दाखल केलेल्या अर्जामध्ये भारतीय जवान किसान पार्टीचे उमेदवार राजेंद्र रामचंद्र संखे, रिपब्लिकन बहुजन सेनेचे विजय ज्ञानोबा घाटे, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचे उमेदवार उत्तम किसनराव तिरपुडे, हिंदू समाज पार्टीचे उमेदवार भवरलाल खेतपाल मेहता आहेत. तर राजीव कोंडिबा भोसले व खाजासाब रसुलसाब मुल्ला या दोन अपक्ष उमेदवारांनी 25 ठाणे लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक (Loksabha Election 2024) निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.