महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून येत्या शुक्रवारी २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राज्यातील लोकसभा निवडणूक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ मतदारसंघात ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले होते. अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रायगड लोकसभा मतदार संघात बारामती-४६, उस्मानाबाद-३५, लातूर-३१, सोलापूर-३२, माढा-३८, सांगली-२५, सातारा-२१, रत्नागिरी-सिंधुदुर्ग-९, कोल्हापूर-२७ आणि हातकणंगले मतदारसंघात-३२ असे एकूण ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

Translate »
×