कल्याण/संघर्ष गांगुर्डे- महावितरणच्या कल्याण परिमंडलात ऑक्टोबर अखेरला अवघे पाच दिवस शिल्लक असताना या महिन्याच्या उद्दिष्टातील 313 कोटी रुपये वसूल होणे अजूनही बाकी आहेत. लघुदाब वर्गवारीतील (कृषी वगळता) ग्राहकांकडे असलेल्या 255 कोटी रुपयांच्या थकबाकीचाही यात समावेश आहे. त्यामुळे थकीत वीजबिलाची वसुली अथवा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे हे दोनच पर्याय सध्या वीज कर्मचाऱ्यांसमोर आहेत. महावितरणची सध्याची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन थकबाकीदार ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.
वीजबिलाच्या वाढत्या थकबाकीमुळे महावितरणला कठीण आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीला गती देण्यासाठी क्षेत्रीय अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांसमवेत विभाग, मंडल, परिमंडल कार्यालयातील अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांची विविध पथके वसुलीच्या कामात व्यस्त आहेत. कल्याण परिमंडलात ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 37 हजार 318 थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यातील 20 हजार 554 ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकी आणि पुन:र्जोडणी शुल्क भरून त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करून घेतला. तर एक हजार रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेले सुमारे 56 हजार ग्राहक रडारवर आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. लघुदाब वर्गवारीतील घरगुती ग्राहकांकडे 135 कोटी, व्यावसायिक ग्राहकांकडे 43 कोटी, औद्योगिक ग्राहकांकडे 65 कोटी, इतर ग्राहकांकडे 12 कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे.वीजबिल भरणा सोयीचा व्हावा, यासाठी सुटीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरु ठेवण्यात आली आहेत. याशिवाय महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल अँप, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
थकीत वीजबिलाचा भरणा टाळणाऱ्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा २९ ऑक्टोबरपर्यंत कधीही खंडित होईल. एकदा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर चालू वीजबिलासह थकबाकी आणि पुन:र्जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पुर्ववत होणार नाही. पुरवठा खंडित केलेल्या ठिकाणी परस्पर वीजपुरवठा जोडणे, शेजारी अथवा इतराकडून वीज घेणे किंवा अनधिकृतपणे वीज वापरल्याचे आढळून आल्यास कायदेशिर व दंडात्मक कारवाई सुरु आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकांच्या माध्यमातून वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. दिवाळी अंधारात जाणार नाही, याची दक्षता घेऊन त्वरित वीजबिलाचा भरणा करण्याचे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी कल्याण परिमंडलातील थकबाकीदार वीज ग्राहकांना केले आहे.
Related Posts
-
कल्याण परिमंडलात ८ लाख ७९ वीज ग्राहकांकडे ३९१ कोटी रुपयांची थकबाकी,वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या कल्याण परिमंडलात लघुदाब वर्गवारीतील (कृषी वगळून) तब्बल…
-
कल्याण परिमंडलात २५१ कोटींचे वीजबिल थकीत,थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन
नेशन न्यूज़ मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- महावितरणच्या कल्याण परिमंडलात सर्व वर्गवारीतील…
-
कल्याण मध्ये महावितरणची ३९ वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागात…
-
३ लाख शेतकऱ्यांनी भरली ३१२ कोटी रुपयांची थकबाकी
मुंबई प्रतिनिधी- नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू…
-
उद्या डोंबिवली व कल्याण पूर्वच्या काही भागात वीज बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित…
-
देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण पश्चिमेच्या काही भागात उद्या वीज बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित…
-
माता रमाई स्मृतीदिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाच्या उंच शिखरावर नेणारी दिव्य…
-
कल्याण परिमंडलात ७० हजार ६८६ थकबाकीदारांची वीज तात्पुरती खंडित
कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या कल्याण परिमंडलात थकीत वीजबिलाचा भरणा टाळणाऱ्या ७० हजार ६८६ ग्राहकांचा…
-
कल्याण पूर्वेत महिला वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - थकीत वीज बिलापोटी मीटर…
-
कल्याण परिमंडलातील ८७ टक्के वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणकडे मोबाईल क्रमांकांची नोंदणी…
-
कल्याण परिमंडलात एक कोटी २९ लाखांची वीजचोरी उघड
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - महावितरणच्या कल्याण परिमंडलात गेल्या…
-
कल्याण परिमंडलात १२७ कोटींचे वीजबिल थकीत,थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या कल्याण परिमंडलात आर्थिक…
-
कल्याण मोहने परिसरात १३९ वीज चोरांविरुद्ध कारवाई,४१ लाखांची वीजचोरी उघडकीस
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या कल्याण पश्चिम…
-
राज्य सरकार वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी दरवर्षी खर्च करणार अडीच हजार कोटी
प्रतिनिधी. मुंबई - वीज क्षेत्रात आमुलाग्र सुधारणा घडविण्याचा संकल्प असून त्याचाच…
-
महावितरण कल्याण एकच्या विशेष पथकाने दोन महिन्यात पकडली १ कोटी ४३ लाखांची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मंडल कार्यालय…
-
टाटा पॉवर उपकेंद्रात तातडीचे दुरुस्ती काम,कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात वीज राहणार बंद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - नेतीवली येथील 132 केव्ही टाटा पॉवर उपकेंद्रात…
-
कल्याण परिमंडलात पथदिवे व पाणीपुरवठ्याची १३५ कोटींची वीजबिल थकबाकी, वीजपुरवठा खंडीत करण्याचा महावितरण इशारा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरण पुन्हा एकदा सक्रीय…
-
कोकण प्रादेशिक विभागात लघुदाब वीजग्राहकांकडे ३५६२ कोटी थकीत,थकबाकी भरण्याचे महावितरण कडून आवाहन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात सर्व वर्गवारीतील (कृषिपंप ग्राहक…
-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन
प्रज्ञासूर्य, बोधीसत्व, भारतरत्न, युगपुरुष ,महामानव, क्रांतिसूर्, विश्वभूषण, उच्चविद्याविभूषित, मानवी हक्कांचे…
-
कल्याण मध्येही वीज कंत्राटी कामगारांचा एल्गार,मोठ्या संख्येने कामगार आंदोलनात सामील
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण /प्रतिनिधी - राज्यभर महानिर्मिती,…
-
कल्याण ट्रॉफी जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धेत मिरारोड विजेता तर कल्याण उपविजेता
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - स्केटिंग असो.ऑफ़ महाराष्ट्रच्या मान्यतेने…
-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा 2024-25…
-
कल्याण एसटी डेपोत कामगारांचा संप
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - लाडक्या बाप्पाच्या…
-
कल्याण मध्ये दुर्मिळ मांडूळ सापाला जीवनदान
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वे अग्निशमन दल येथील अग्निशमन दलात…
-
कल्याण लोकसभेत मनसेचा पदाधिकारी मेळावा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माणुसकीची भिंत
प्रतिनिधी. कल्याण -महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार…
-
वीज कंपनीत मेघा भरती
प्रतिनिधी. मुंबई - ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास…
-
डोंबिवलीत वीज वितरण यंत्रणेला आग
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - रोहित्राजवळ टाकलेल्या कचऱ्याला…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवराज्याभिषेक दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज…
-
अनियमित वीज पुरवठ्याचा कापूस लागवडीवर परिणाम
DESK MARATHI NEWS ONLINE. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात…
-
दूधगंगा पतसंस्थेत 80 कोटी रुपयांचा आर्थिक अपहार
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oTT-hLXRWxc अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर…
-
कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
प्रतिनिधी. कल्याण - ग्रामपंचायतीच्या निवडणूक ह्या त स्थानिक नागरिकांचा सक्रिय…
-
कल्याण मधील विकासकाच्या सेल्स् आँफिसला नागाचा फेरफटका
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील विकासकांच्या सेल्स आँफिसच्या प्रिमायासेस मध्ये नाग…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त…
-
कल्याण रेल्वे स्थानकात सापडले ५४ डिटोनेटर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे स्थानकात…
-
कल्याण डोंबिवलीत ३१ नवीन रुग्ण कल्याण पूर्वेत संसर्ग वाढला कोरोना रुग्णांची संख्या गेली ९४२
प्रतिनिधी. कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ३१ …
-
स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कामगार कल्याण निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण…
-
कल्याण मधील दुर्गाडी खाडीत एनडीआरएफची प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कल्याण…
-
कल्याण पूर्वेत मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे शंखनाद आंदोलन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपाने राज्यभरात मंदिराबाहेर…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
कल्याण पूर्वेत ३८ वर्षीय महिलेची हत्या, आरोपीला अटक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- कल्याण कोळशेवाडी परिसरातील रिक्षा चालकाने…
-
कल्याण वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट वापराबद्दल जनजागृती
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेवर महिलांचा हंडा कळशी मोर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील बेतुरकर…