महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image लोकप्रिय बातम्या शिक्षण

सामाजिक न्याय विभागाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

    मुंबई/प्रतिनिधी –  भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, विकलांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती,  उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती,  राष्ट्रीय ओवरसीज शिष्यवृत्ती राष्ट्रीय फेलोशिप अशा विविध योजना सुरू आहेत. या योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई शहर  यांनी केले आहे.

    शिष्यवृत्ती योजना संदर्भात विस्तृत माहिती खालीलप्रमाणे आहे.दिव्यांग विदयार्थ्यासाठी प्री मट्रिक शिष्यवृत्ती मध्ये इयत्ता 9 वी आणि 10 वी चा समावेश आहे. ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न – 2.50 लाख आहे त्या पाल्यांना शिष्यवृतीचे दर  हा  डे स्कॉलरसाठी 500 रुपये दरमहा आणि वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्याकरिता 800 रुपये दरमहा शिष्यवृत्ती आणि पुस्तके अनुदान आणि विकलांग भत्ता ज्याची वार्षिक मर्यादा 2000 रुपयांपासून ते 4000 रुपयांपर्यंत असु शकते.

    दिव्यांग विद्यार्थ्यासाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती साठी इयता 11 वी पासुन मास्टर डिग्री आणि डीप्लोमा स्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे.ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न – 2.50 लाख आहे अशा पाल्यांना त्याचा लाभ घेता येईल.शिष्यवृतीचे दर पुढीलप्रमाणे आहे विविध विषयात डिग्री डिप्लोमा इत्यादीतुन संबंधित स्नातकोत्तर, स्नातक, डिप्लोमा  व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता देखरेख भत्त्याचे दर विविध आहेत. ही वसतिगृहात  राहणाऱ्या  विद्यार्थ्याकरिता 900 -1600 रुपये दरमहा तसेच डे स्कॉलरसाठी 550-750 रूपये दरमहा मर्यादेत ट्युशन शुल्क (अधिक वार्षिक मर्यादा 1.50 लाख रूपये) पुस्तक भत्ता आधिक विकलांग भत्ता ज्याची वार्षिक मर्यादा 2000 रुपयांपासून ते 4000 रुपयांपर्यंत असु शकते.

    दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती मध्ये सर्वोत्कृष्टेतकरिता 241  अधिसूचीत संस्थानात स्नातक,स्नातकोत्तर डिग्री आणि डिप्लोमा या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.ज्या  पालकांचे वार्षिक उत्पन्न 6.00 लाख आहे, अशा पाल्यांना ही योजना लागू आहे.वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांकरिता 3000 रुपये दरमहा आणि डे स्कॉलरसाठी 1500 रुपये दरमहा देखरेख भत्ता, वार्षिक पुस्तक अनुदान यासाठी 5000 रुपये आणि वार्षिक टयुशन शूल्क 2.00 लाख रुपयांपर्यंत असेल. उपकरणासह संगणक खरेदीसाठी खर्चाची परतफेड 30,000/- (पुर्ण कोर्समध्ये एकदा) विशिष्ट दिव्यांगत्वाशी  संबंधित आवश्यक सॉफ्टवेअर सहाय्यक उपकरण खरेदीसाठी खर्चाची परतफेड-30,000/- (पुर्ण कोर्समध्ये एकदा) करता येईल.

    दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती साठी  अर्ज करण्याची पद्धत राष्ट्रीय शिष्यवृती पोर्टल माध्यमातुन कार्यान्वित केली जात आहे.राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल(www.scholarship.gov.in)यावर ऑनलाईन अर्ज करावा. अद्यावत माहितीसाठी कृपया www.scholarship.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी तसेच अर्ज सादर करण्यासाठी प्रपत्र सदर विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या बेवसाईटवर देण्यात आलेले आहे.

    दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय ओवरसीज शिष्यवृत्ती साठी परदेशात असलेल्या विद्यापीठात मास्टर डिग्री आणि डॉक्टरेट डिग्री यांचा समावेश आहे.ज्या  पालकांचे वार्षिक उत्पन्न  6.00 लाख(सहा लाख) आहे त्यांच्यासाठी यु.के. करिता 9900 पाँड (ग्रेट ब्रिटन) आणि इतर देशांसाठी  1500 युएस डॉलर  वार्षिक देखरेख भत्यासह ट्युशन शुल्क, वार्षिक आपत्कालिन भता, हवाई प्रवास किंमत इत्यादी. शिष्यवृतीचे दर आहेत. योजनेच्या अटीनुसार उमेदवाराची योग्यतेचे पात्रता आणि मूल्यांकन उमेदवार केल्यानंतर www.disabilityaffairs.gov.in या वेबसाइटवर दिलेल्या विहित अर्जामध्ये करेन.योजनेची अर्ज राष्ट्रीय वृतपत्रात जाहिरात केली जाईल आणि वेळोवेळी प्राप्त झालेल्या योजनेच्या | अजांची निवड कमिटीद्वारे निवड करून निवड समितीने निवडलेल्या उमेदवाराना योग्यतेनुसार ठेवली जाईल निवड समितीची स्थापना भारत सरकार करेल.

    दिव्यांग विदयार्थ्यासाठी राष्ट्रीय फेलोशिप भारतीय विद्यापीठात एम. फील व पीएच.डी. या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न  कोणतीही अधिक मर्यादा नाही. अशा पाल्यांसाठी जेआरएफ (पहिले दोन वर्ष) करिता रु.25000/- तसेच एस आर एफ करिता  रु.28000/- दरमहा (तिसऱ्या वर्षापासुन अभ्यासक्रम पुर्णता अवधी संपेपर्यंत) तसेच आपत्कालिन अनुदान, एस्कोर्ट भत्ता/रिडर भत्ता, घर भाडे भत्ता इत्यादी (लागु दरात) असे   शिष्यवृतीचे दर  आहेत.फेलोशिपसाठी विद्यापीठ अनुदानआयोगाद्वारे निवड केली जाते.जेव्हा कधी युजीसीव्दारे अर्ज आमंत्रित करण्यात तेव्हा उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

    नि:शुल्क कोचिंग साठी शासकीय सार्वजिनिक क्षेत्रात नोकरीसाठी प्रतिस्पर्धा परिक्षेत समाविष्ठ होण्यासाठी आणि तंत्रज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश हेतु यांचा समावेश आहे.ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 6.00 लाख आहे.या विभागाअंतर्गत सुप्रसिद्ध कोचिंग संस्थानाला कोचिंग शुल्क द्यावे लागते. विद्यावेतन आणि  विशेष विकलांग भत्ता बाह्य उमेदवारांकरिता 5000/- रुपये दरमहा तसेच स्थानिक  उमेदवारांकरिता 2500 रूपये दरमहा देय शिष्यवृत्ती देय असेल.कोचिंग संस्थानाच्या कोचिंग सुचिबद्धतेकरिता विकलांग अधिकार अधिनियम 2016 अतंर्गत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त कोचिंग संस्था संबधित राज्यसरकार तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या शिफारशीनुसार निर्धारीत अर्जात त्यांचे प्रस्ताव पाठवू शकतात.

    दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृती, दिव्यांग विद्याथ्र्यांसाठी पोस्ट मैट्रिक शिष्यवृत्ती, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृती. या तीनही शिष्यवृत्ती योजना राष्ट्रीय शिष्यवृती पोर्टल माध्यमा कार्यान्वित केल्या जात आहेत आणि शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभाथ्र्यांना DBT मार्फत PFMS प्रणालीद्वारे दिली जाते.

    राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (www.scholarship.gov.in) यावर ऑनलाईन अर्जदारांनी अर्ज करावा.पोर्टलवर अर्ज जमा करणे पडताळणीसाठी अंतिम दिनांक खालीलप्रमाणे आहेत. शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थी नोंदणी ची तारीख विद्यार्थ्यासाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती व दिव्यांग विदयार्थ्यासाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती. 30 नोव्हेंबर  2021, संस्थेमार्फत पडताळणी 15 डिसेंबर 2021 रोजी केली जाणार आहे.

    अद्यावत माहितीसाठी कृपया www.scholarship.gov.in या वेबसाईटला भेट द्या. अर्ज सादर करण्यासाठी प्रपत्र सदर विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या बेवसाईटवर देण्यात आलेले आहे.असे एका पत्रकाव्दारे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई शहर  यांनी केले आहे.

    Related Posts

      Leave a Reply

      Your email address will not be published. Required fields are marked *

      Translate »