महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी मुंबई

मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांना महाडिबीटी वर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन

प्रतिनिधी.

मुंबई – मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेशीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता महाडिबीटी पोर्टल ३ डिसेंबर पासून सुरू झालेले आहे.

त्याअनुषंगाने अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नूतनीकरणाकरिता दि. 15  जानेवारी तर नव्याने प्रवेशीतांकरीता दि. 31 जानेवारी या अंतिम मुदतीच्या आत महाडिबीटी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावेत. तसेच महाविद्यालयांनी पडताळणी करुन परिपूर्ण पात्र अर्ज जिल्हा समाज कल्याण लॉगीनला विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने पाठवावेत असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर श्री.प्रसाद खैरनार यानी केलेले आहे

Translate »
×