Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
चर्चेची बातमी हेल्पलाईन

महास्वयंम् वेबपोर्टसंदर्भातील अडचणी, तक्रारींसाठी हेल्पलाईन सेवेचे लाभ घेण्याचे आवाहन

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे / प्रतिनिधी – कौशल्य,रोजगार, उद्दोजकता व नाविन्यता विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या महास्वयंम (https://www.mahaswayam.gov.in) पोर्टलसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००१२०८०४० ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा उमेदवार/उद्योजक/नियोक्ते यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त संध्या साळुंखे यांनी केले आहे.

महास्वयंम् वेबपोर्टलवर विविध लाभार्थी घटक (स्टेक होल्डर्स) जसे उमेदवार /उद्योजक / नियोक्ते इ. यांना या संकेतस्थळावर नोंदणी करणे, नोंदणीचे अद्ययावतीकरण करणे, रिक्तपदे अधिसूचित करणे, रिक्तपदास अनुसरून अर्ज करणे, राज्यातील युवक व विद्यार्थी यांना करिअरविषयक संधीची माहिती, रोजगार मेळावे व रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम यामध्ये इच्छुकता दर्शविणे, विविध प्रशिक्षण संस्था, स्टार्टअप इ. विविध ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या ऑनलाईन सेवा घेतांना लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी/तक्रारींची निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री हेल्पलाईन अंतर्गत हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनचा टोल फ्रि क्रमांक- १८००१२०८०४० असा आहे. या हेल्पलाईनची वेळ स.८.०० वा ते रात्री ८.०० वाजेपर्यंत अशी आहे. या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन साळुंखे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X