महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image कला/साहित्य लोकप्रिय बातम्या

लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट महिला काव्यसंग्रह पुरस्कारासाठी आवाहन

नेशन न्युज मराठी टिम.

कल्याण – लोककवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने पु ल कट्टा, कल्याण तर्फे अनेक अभिनव कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून, लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समितीतर्फे महिला कवियत्रीच्या काव्यसंग्रहास “राज्यस्तरीय वामनदादा कर्डक सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दि: ०१/०१/२०२१ ते ३१ १२/२०२१ या कालावधीत प्रकाशित काव्यसंग्रह या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात येत आहेत. “राज्यस्तरीय वामनदादा कर्डक सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह महिला विशेष पुरस्कार” मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ₹१०,०००/- रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

काव्यसंग्रह पाठविण्याची अंतिम तारीख १५ में २०२२ असून, काव्यसंग्रह सचिव / स्पर्धा समन्वयक, द्वारा: सुधीर दिपचंद चिते, ४०३, ‘नर्मदा’, विजय बाग, मुरबाड रोड, रोशन पेट्रोल पंप समोर, कल्याण (प) ४२१३०१ या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहिती करीता 9594562816 (केवळ व्हाट्स अप ) संपर्क साधावा, ऑगस्ट २०२२ मध्ये संपन्न होणाऱ्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे आवाहन समितीचे स्वागताध्यक्ष आमदार श्री विश्वनाथ भोईर आणि अध्यक्ष कवी किरण येले, यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×