नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
धुळे/प्रतिनिधी – शिरपूर तालुका पोलिसांनी गुटखा कारवाई करत ट्रक चालकासह मोठ्या प्रमाणात गुटखा व मुद्देमाल हस्तगत केला आहे, 11 लाख 70 हजार रुपयांचा गुटखा व 8 लाख रुपये किमतीचे आईसर वाहन असा एकंदरीत 19 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईदरम्यान जप्त केला आहे.
शिरपूर तालुका पोलिसांना गुप्त माहितीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलीस अधिकाऱ्यांनी सापळा रचत गुटख्याने भरलेला आयशर ट्रक जप्त केला आहे. त्यामध्ये तपासणी केली असता विविध प्रकारचा गुटखा हा पोलिसांना आढळून आला आहे, यासंदर्भात शिरपूर तालुका पोलीस पुढील तपास करीत आहेत.