कल्याण/संघर्ष गांगुर्डे – दक्षिण आफ्रिकेहुन आलेल्या 32 वर्षीय रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले आहे .या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जिनोम सिक्वेन्सिंग टेस्टसाठी पाठवले असून अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही .सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे . दिलासादायक बातमी अशी की केडीएमसी कडून त्याच्या कुटुंबियांची देखील टेस्टिंग करण्यात आली असून त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत .
दरम्यान दक्षिण आफ्रिकेहुन आलेल्या रुग्णासोबत विमानात 42 सह प्रवाशी होते .या 42 प्रवाशाची यादी केडीएमसीने शासनाला दिली असून ज्या भागात प्रवासी राहतात त्या त्या महापालिकेकडून त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे .दरम्यान या 42 मधील आणखी एक प्रवासी डोंबिवली मधील असल्याचं आढळून आलं आहे .या 50 वर्षीय प्रवाशाची आज कोरोना टेस्टिंग होणार असून केडीएमसीकडून त्याला क्वारटाईन करण्यात आले आहे या प्रवाशाची प्रकृती स्थिर असल्याचे केडीएमसी च्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले .दरम्यान कोरोना टेस्टिंग नंतर या 50 वर्षीय प्रवाशाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंग टेस्ट साठी पाठवले जाणार असल्याचे केडीएमसी आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले .
ओमीक्रोन (omicron) कोवीड (covid) व्हेरीयंटच्या धर्तीवर शासनाने दक्षिण आफ्रिकेसह इतर देशातून आलेल्या नागरिकांची शासनाकडून टेस्टिंग सुरू करण्यात आली आहे .डोंबिवलीत 23 नोव्हेंबर रोजी नायझेरिया येथून सहा प्रवासी आल्याची माहिती केडीएमसी प्रशासनाणे दिली आहे .या सहा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. आज त्यांची कोरोना टेस्टिंग करन्यात आली असून त्यांचा अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती केडीएमसी च्या आरोग्य विभागाने दिली आहे .नायझेरियातून आलेले सहा प्रवासी आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला असून या प्रवाशांच्या कुटुंबियांची देखील कोरोना टेस्टिंग करण्यात येनार आहे अशी माहिती डॉ प्रतिभा पानपाटील केडीएमसी साथ रोग नियंत्रण अधिकारी यांनी दिली आहे.