संभाजीनगर प्रतिनिधी – देशासाठी काहीतरी करावं ही प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येक जण आपापल्या परीने काही नाही काही करण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते क्षेत्र कोणतेही असो कोणी देश सेवेतून तर कोणी खेळाच्या माध्यमातून देशाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करत असतो. छत्रपती संभाजीनगर शहरातील सृष्टी साठे हिने आशियाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सृष्टीला रौप्य पदक पटकावले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला आहे.
सृष्टी ही मूळची छत्रपती संभाजीनगर शहरातील आहे. ती सांगते की तिच्या वडिलांना खेळाची फार आवड आहे. आणि माझ्या वडिलांमुळे मी खेळाकडे वळले अस सृष्टी सांगते. मी माझ्या फिटनेससाठी बॉक्सिंग जॉईन केली होती. पण नंतर मला यात आवड निर्माण झाली आणि यामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. मी गेल्या सहा वर्षांपासून बॉक्सिंग करत आहे.
माझे कोच सनी गहलोत यांनी माझ्याकडून स्पर्धेची संपूर्ण तयारी करून घेतलेली आहे. कसा सराव करावा काय सराव करावा हे सर्व मला माझ्या कोच ने सांगितलं आहे. मी दररोज सकाळ आणि संध्याकाळ तीन तास सराव करते. आणि या सरावामुळे माझे या स्पर्धेमध्ये माझी निवड झालेली आहे. स्पर्धेत निवड झाल्यानंतर मी सर्व ट्रायल्स जिंकले. आणि त्यानंतर मी कझाकिस्तान या ठिकाणी स्पर्धेसाठी गेले. या ठिकाणी माझी कॉटर फायनल ही चायनीज तायके सोबत होती. आणि ती मी जिंकले त्यानंतर माझी सेमी फायनल कझाकिस्तानची बॉक्सर सोबत होती. ती दोन वेळेस एशियन चॅम्पियन होती. तिच्यासोबत खूप टफ कॉम्पिटिशन होतं आणि त्यामध्ये सुद्धा मी विजय मिळवला. माझ्या कोचने ज्या मला टेक्निक सांगितल्या होत्या त्या सर्व मी या ठिकाणी वापरल्या आणि यामुळेच माझा विजय झाला. सृष्टीने साठे हीने ६३ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावल आहे. मला आता भारताला रिप्रेझेंट करायचा आहे ते सुद्धा ऑलम्पिक मध्ये. आणि यामध्ये मला पदक हे पटकवायच आहे. त्यासाठी माझा सराव आणि माझे प्रयत्न सुरू आहेत अस सृष्टी साठे ने सांगितले आहे.