महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image आरोग्य

नदीत बुडणाऱ्या मुलांना वाचवणाऱ्या रक्षकाचा, जीव वाचवण्यासाठी देवदूतांचा पुढाकार

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – समाजात हल्ली माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडत असताना माणुसकीसाठी माणुसकी धावून आली आहे. नदीमध्ये बुडणाऱ्या चार मुलांना वाचवणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी पांढऱ्या वेशातील देवदूतांनी पुढाकार घेतल्याचा कौतुकास्पद प्रकार कल्याणात घडला.

कल्याण मुरबाड मार्गावरील म्हारळ गावाजवळ असलेल्या उल्हास नदीमध्ये आज सकाळी काही मुलं पोहण्यासाठी उतरली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने काही जण गटांगळ्या खाऊ लागली. त्यावेळी नदीकिनारी असणाऱ्या अनिल राक्षे या ग्रामस्थाला ही गटांगळ्या खाणारी मुले दिसली. आणि त्याने क्षणाचाही विचार न करता थेट नदीमध्ये उडी घेत या बुडणाऱ्या मुलांना बाहेर काढले. मात्र या मुलांचा जीव वाचत वाचवताना अनिल नदीमध्ये असणाऱ्या गाळात जाऊन रुतला आणि नाका तोंडात पाणी गेल्याने तिकडेच तो बेशुद्ध झाला. दरम्यान त्याची पत्नी ही नदी शेजारीच कपडे धुवत होती. तिने हा सर्व प्रकार पाहिला आणि आरडाओरडा करून काही लोकांना मदतीने नदीमध्ये बेशुद्ध झालेल्या अनिलला बाहेर काढले. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिका चालकाने मागचा पुढचा विचार न करता आणि कोणताही मोबदला न घेता अनिलला कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा येथील जी प्लस हार्ट हॉस्पिटलमध्ये आणले. एकंदर परिस्थितीचे गांभिर्य या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता आणि कागदपत्रांमध्ये वेळ न वाया घालवता अनिलला रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू केले. अनिलच्या शरीरामध्ये तसेच मेंदूपर्यंत नदीचे पाणी गेले होते. या रुग्णालयाचे डॉक्टर अमोल चव्हाण आणि निलेश उपाध्याय यांनी आपल्या प्रयत्नांची शर्थ करत अनिलच्या शरीरातून सर्व पाणी बाहेर काढत अनिलला नवीन जीवनदान दिले. शरीरातून पाणी बाहेर काढल्यानंतरही अनिल तब्बल 26 तास बेशुद्ध अवस्थेत होता. मात्र आज सकाळी अनिलला शुद्ध आली आणि त्याच्या कुटुंबीयांसह जी प्लस हार्ट हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल चव्हाण आणि डॉ.निलेश उपाध्याय यांनी सुटकेचा विश्वास सोडला.

जी प्लस हार्ट हॉस्पिटल डॉक्टर अमोल चव्हाण आणि डॉक्टर निलेश उपाध्याय यांच्या प्रयत्नांमुळेच माझा भाऊ मृत्यूच्या दाढेतून परत येऊ शकला अशी प्रतिक्रिया अनिलच्या भावाने व्यक्त केली. तसेच आमची आर्थिक परिस्थिती पाहून रुग्णालयानेही नाममात्र दरात अनिल वर उपचार केल्याबद्दल त्याच्या कुटुंबीयांनी डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाचे मनापासून आभार मानले.

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बोलणाऱ्या मुलांना वाचवणारा अनिल असो की अनिलला रुग्णालयात घेऊन येणारा तो रुग्णवाहिका चालक असो. की अनिलचा जीव वाचवणारे ते डॉक्टर असो. या सर्व घटनेतून माणुसकीसाठी माणुसकी धावून आल्याचे दुर्मिळ उदाहरण समोर आले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »