Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image कृषी लोकप्रिय बातम्या

कृषी विभागाची एक महत्वपूर्ण योजना,कृषी यांत्रिकीकरण योजना

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – कृषी विभागाची एक महत्वपूर्ण योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना होय. कृषीविषयक यांत्रिकीकरणाची मदत ही या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. या योजनेविषयी जाणून घेऊया…

पात्र लाभार्थी – सर्व खातेदार शेतकरी, शेतकरी गट / एफपीओ / सहकारी संस्था

आवश्यक कागदपत्रे –7/12 व 8 अ, आधारकार्ड छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची प्रत व संवर्ग प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.

समाविष्ट बाबी –कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत ट्रॅक्टर, पावर टिलर, स्वयंचलित यंत्र व औजारे, ट्रॅक्टर व पावर टिलर चलित यंत्र व औजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित औजारे, प्रक्रिया युनिटस भाडे तत्वावर कृषी यंत्र व औजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी (औजारे बँक) यांचा समावेश असणार आहे. यात अनुदानाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, अल्प, अत्यल्प, भूधारक शेतकरी व महिलांना ट्रॅक्टरसाठी 1.25 लाख व इतर बाबींसाठी 50 टक्के औजारे अशी मदत मिळणार आहे. इतर लाभार्थ्यांना ट्रॅक्टरसाठी 1 लाख तर इतर औजारेसाठी 40 टक्के किंवा मंजूर कमाल अनुदान मर्यादा यापैकी कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे. औजारे बँक या घटकांतर्गत समाविष्ट बाबींमध्ये ट्रॅकर आणि इतर पसंतीनुसार औजारे यांचा समावेश असणार आहे .10 लाखापर्यंत अनुदान 40 टक्के (चार लाख), 25 लाखापर्यंत 40 टक्के अनुदान (10 लाख) असणार आहे.

संपर्क – अधिक माहितीसाठी mahadbtmahait.gov.in  हे संकेतस्थळ तसेच तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X