महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ठाणे मुख्य बातम्या

भिवंडी शिळ रस्त्या बाबत केडीएमसीत महत्वाची बैठक संपन

कल्याण प्रतिनिधी- भिवंडी ते शिळ या २१ किलोमीटर ४ पदरी  रस्त्याचे ६ पदरीकरणाचे काम एमएसआरडीसीच्या  माध्यमातून  सुरु असून या संदर्भातील अडीअडचणी निस्तरण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बैठक पार पडली.  या बैठकीला एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील, आरटीओ अधिकारी उपस्थित होते.

   या रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असून यामध्ये २ पदरी रस्त्याचे बऱ्यापैकी काँक्रीटीकरण झाले असल्याने वाहतूक कोंडी देखील बहुतांशी सुरळीत झाली आहे.  उर्वरित रस्त्याचे काम पावसाळ्या आधी कसे पूर्ण करता येईल या अनुषंगाने हि बैठक  घेण्यात आली. काही ठिकाणी भूसंपादनाच्या समस्या असून त्या देखील सोडविण्याच्या सूचना करण्यात आल्या.  रस्त्याचे काम करतांना वाहतूक कोंडीच्या काही समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी वाहतूक विभागाला  देखील सूचना करण्यात आल्या आहेत.  असल्याची माहिती  एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी दिली.       

Translate »
×