नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर / प्रतिनिधी – सध्या ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत.मराठवाड्यातील त्यांचा दौरा फक्त शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रश्न समजून घेण्यासाठी आहे असे ते म्हणाले. माध्यमाशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विद्यमान सरकारचा चांगलाच समाचार घेतला. त्यावेळी आदित्य म्हणाले. कोट्यवधींचा खर्च होऊन त्यातून जर का मराठवाड्याला काही मिळत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. मात्र असाच खर्च गोवाहाटी या ठिकाणी केला आहे हा खर्च कुठून आला हा प्रश्न अजूनही आहे.
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घोषणा झाल्या तर त्याची अंमलबजावणी होणार आहे का ? काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली होती पिकांचे नुकसान झाले होते मात्र अद्यापही कुठल्याही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही त्यामुळे अजून किती खोटी आश्वासन हे खोके सरकार देणार आहे. उद्या मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक आहे, या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठवाड्याला काय मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. असेही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार बसलेले आहे आणि यामुळे आपल्याकडे जागतिक लोकशाही दिवस साजरा करायचा की नाही हा प्रश्न पडतो. जी आश्वासन दिले आहे तेच अद्यापही पूर्ण झाले नाहीत यापूर्वी आमच्या आमदारांनी असे प्रश्न केले होते तेव्हा सरकार अडचणीत आले होते मात्र सरकार तोडाफोडीत मध्ये व्यस्त आहे. हे सरकार कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरचे आहे जनतेचे राहिलेले नाही. तीन जवान शहीद झाले त्यावेळेला आम्हाला प्रश्न पडला की भारतीय जनता पक्षामध्ये कसले सेलिब्रेशन सुरू होते आणि याचे उत्तर भाजपाने द्यायला हवे.असा सवालही यावेळी आदित्य टाकरे यांनी सरकारला केला.