महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

नवी मुंबईत अज्ञात हल्लेखोरांनी केली हॉटेल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची हत्या

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नवी मुंबई/प्रतिनिधी – वाशी येथील किनारा बार व रेस्टॉरंटमधील साफसफाई कर्मचाऱ्याची पहाटे 5 वाजता हॉटेल बाहेरच अज्ञात हेल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करत केली हत्या आहे. यामध्ये मध्यस्थी करणारा सुरक्षारक्षक देखील जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.

मुकेश यादव असे मयत इसमाचे नाव आहे. मयत इसम पहाटे घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होते त्यांच्या हातामध्ये एक थैली होती ही थैली खेचून घेण्याचा प्रयत्न अज्ञात हल्लेखोरांनी केला मात्र थैली न दिल्याने या हल्लेखोरांनी चाकूने वार केले व यात त्याचा मृत्यु झाला आहे. वाशी पोलीस सिसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती वाशी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर भट्टे यांनी दिली आहे.

Translate »
×