महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

स्वतंत्र्याच्या अमृत मोहत्सवी आदिवाशी बांधवाची वाट खडतरच

नेशन न्यूज मराठी टीम.

अहमदनगर/प्रतिनिधी – संगमनेर तालुक्याच्या अकलापूर गावांतर्गत असणाऱ्या शेळकेवाडी मधील तास टेक वाडी ते घारगाव रस्त्याची दुरावस्था बघता कोणत्याही सरकारचे लक्ष दिसत नाही. टास टेक वाडी मध्ये मोठ्या प्रमाणात आदिवाशी बांधव राहतात. जगाने एकविसाव्या शतकाकडे वाटचाल केली आहे. परंतु या आदिवासी भागात आजही जाण्या-येण्याचा मार्ग खूप खडतर आहे पाण्या पावसाच्या दिवसात मुलांना अक्षरशः शाळेत येणं जाणं देखील कठीण होत आहे. संपूर्ण देशातच स्वतंत्र्याच्या अमृत मोहत्सवी सुद्धा आदिवाशी बांधवाची वाट खडतरच दिसत आहे.

शासनाचे आठ वर्षांपासून 45 घरकुल यांना मंजुर आहेत.परंतु फक्त कागदावरच ते काय प्रत्यक्षात अमलात येत नाही. परंतु याकडे ना शासनाचे लक्ष नाही. स्थानिक पुढाऱ्यांचे लक्ष त्यामुळे ही आदिवासी जनता पूर्ण मेटा कुटीला आली असून यांनी आता मतावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनाने यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराच येथील स्थानिकांनी दिला आहे. एकीकडे शासन आदिवासींसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे आणि जे करायला पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आता तरी सरकार माय बापाला जाग यावी आणि आमचे प्रश्न मार्गी लावावे असा सूर या जनतेतून दिसून येऊ लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×