अंबरनाथ/प्रतिनिधी – गटारी जवळ येत नासल्यांन गावठी दारूला सध्या शहरी भागात मोठी मागणी वाढत चालली आहे.या साठी ग्रामीण भागात डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारू निर्मिती केली जात आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जवानांनी दारू निर्मिती आधीच चार लाखांचा नवं सागर मिश्रित रसायन मलंगगड भागात नष्ट केलं आहे.गावठी दारूची वाढती मागणी लक्षात घेता सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात निर्मिती ही गावठी दारूची केली जात आहे.मात्र या दारूला बाजारात विक्रीसाठी परवानगी नसल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मलंगगड भागात दारू निर्मितीसाठी तयार केले जात असलेले रसायन नष्ट करण्याचा धंडाका राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरू केला आहे.मलंगगड भागातील उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुंभार्ली आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माणेरे गावच्या शिवारात १६,८०० लिटर रसायन नष्ठ करण्यात आला आहे.
या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबरनाथ विभागीय पथकाने तीन गुन्हे दाखल करत धडक कारवाई केली आहे.त्यामुळे सध्या दारू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभाचे पोलीस निरीक्षक आर.बी.राठोड यांसह जवान पी. एन. यशवंतराव,पी.टी. पडवळ,व्ही.एन.सानप यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे.ग्रामीण भागात निर्माण होत असलेली गावठी दारू शहरी भागात विक्रीसाठी जाऊ नये याआठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे.विक्रीवर कारवाई करण्याआधी राज्य उत्पादन शुल्क विभागाने थेट दारू निर्मितीच्या मुळाशी जाऊन तळच उध्वस्त केले आहे.त्यामुळे आता दारू माफियांचे धाबे ग्रामीण भागात चांगलेच दणाणले आहेत.