नेशन न्यूज मराठी टीम.
बीड / प्रतिनिधी – राज्यातील बस स्थानकामध्ये घाणीचे साम्राज्य पाण्याची व्यवस्था यासह योग्य ती नियोजन नसल्याच्या गोष्टी आपण ऐकल्या असतील. प्रत्येक जिल्ह्यातील बस स्थानके आजही घाणीच्या विळख्यात आहेत. मात्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बस स्थानक याला अपवाद आहे.बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बस स्थानकाने स्वच्छतेत राज्यात १०० पैकी ८३ गुण प्राप्त केले आहेत. त्यामुळे हे बस स्थानक सध्या संपूर्ण राज्यामध्ये आदर्श स्थानक बनले आहे.
हिंदू हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यातील ५८१ पैकी ५६० एसटी स्थानकातील सर्वेक्षण झाले. पहिल्या टप्प्यांतर्गत राज्यातील २९१ स्थानकातील स्वच्छतेचा दर्जा वाईट असून केवळ २८ स्थानकांमध्ये चांगला प्रकारची स्वच्छता राखली जात असल्याचे वास्तव एसटी महामंडळाच्या अहवालात समोर आले आहे.