Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ताज्या घडामोडी राजकीय

अंबादास दानवे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी – मराठवड्यातील महत्वाचा मतदारसंघ असणाऱ्या संभाजीनगरमध्ये एमआयएमचे चे उमेदवार इम्तियाज जलील आणि महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यात लढत होणार आहे. ज्याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे. नुकतेच संभाजीनगर मतदारसंघात निवणूक पर पडली. यादम्यान उद्धव ठाकरे गटाचे तसेच छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख असलेल्या अंबादास दानवे यांनी आपल्या पूर्ण कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर संभाजीनगरमधील जनतेला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अंबादस दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले “परिवारासह मतदान करण्यासाठी आम्ही आलो आहोत. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या भारतामध्ये आहे आणि या लोकशाहीमध्ये मतदान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य करत असताना निश्चितपणे मतदानाच्या दिशेने देश जात आहे असे चित्र आहे. मतदान करून परिवर्तनाचा साक्षीदार म्हणून सहभागी राहण्याचा प्रयत्न आमच्या सर्व कुटुंबाने केला. सर्वांनी शंभर टक्के मतदान करावे. मतदान करणे हा लोकशाहीमधील सगळ्यात महत्वाचा अधिकार आहे.” लोकसभा निवडणुकीदरम्यान घडणाऱ्या गैरप्रकारांवर दानवे यांनी भाष्य केले. ते म्हणाले “सकाळी मला फोन आले काही ठिकाणी ईव्हीएम मशीन खराब झाल्यामुळे गंगापूर, वैजापूर, सोयगाव इथून फोन आले होते. मला असं वाटतं असं कधी कुणी करणार नाही. जो हरणारा आहे तो असे प्रकार करतो. जर असं काही होत असेल तर आम्ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू.” संभाजीनगरमध्ये मागील निवडणुकीपेक्षा जास्त मतदान होईल, मागच्या वेळेस पेक्षा जास्त टक्केवारी असेल असा विश्वास यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे.

Translate »
X