महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

डोंबिवलीत कोरोनाविरोधात सर्वपक्ष एकत्र,लवकच डोंबिवलीत सर्वपक्षीय कोवीड मदत केंद्र

कल्याण प्रतिनिधी – राज्यात एकीकडे कोरोनाच्या विषयावरून जोरदार राजकारण सुरू असताना डोंबिवलीतील राजकारणी मात्र त्याला अपवाद ठरल्याचे आज दिसून आले. डोंबिवली शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि तोकडी पडणारी यंत्रणा पाहता या सर्वपक्षीय राजकारण्यांनी अखेर ‘हम सब एक है’ चा संदेश देत कोरोनाविरोधात दंड थोपटले आहेत. ‘डोंबिवली सर्वपक्षीय कोवीड मदत केंद्रां’तर्गत हे सर्व जण एकत्र आले असून त्यांनी महापालिकेच्या कोवीडविरोधी लढ्यात हातभार लावण्याचा विडा उचलला आहे.
सध्या राज्यामध्ये कोरोनावरून प्रमूख पक्षांमध्ये मोठे राजकारण सुरू आहे. सध्याच्या कठीण प्रसंगात राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असताना प्रत्यक्षात मात्र उलटेच चित्र दिसत आहे. परंतु सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असणाऱ्या डोंबिवली नगरीने हे नकारात्मक चित्र खोडून काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दिवसेंदिवस खराब होणारी डोंबिवलीची परिस्थिती पाहता डोंबिवलीतील शिवसेनेचे नेते सदानंद थरवळ यांनी इतर पक्षीय नेत्यांना एकत्र येण्याची साद घातली. आणि इतर पक्षीय नेत्यांनीही आपापले राजकारण बाजूला ठेवून या हाकेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सदानंद थरवळ यांच्यासह काँग्रेस पक्षाचे जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदू मालवणकर, मनसेचे प्रकाश माने, भाजपचे नंदू परब आणि आरपीआयचे किशोर तांबे यांनी एकत्रित येत आज महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेत चर्चा केली.

सध्या कोवीड पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ सुरू आहे. बेड कुठे मिळेल, इंजेक्शन कुठे मिळेल? प्लाझ्मा कुठे मिळेल? ऍम्ब्युलन्स कुठे मिळेल? कोवीड टेस्ट कुठे करायची? लसीकरण कुठे सुरू आहे? यांसारख्या असंख्य प्रश्नांनी डोंबिवलीकर सध्या हैराण झाले आहेत. याबाबत नेमकी कुठे माहिती मिळेल याचीच अनेकांना माहिती नसल्याने या डोंबिवली सर्वपक्षीय कोवीड मदत केंद्राची स्थापना करत असल्याचे सदानंद थरवळ यांनी सांगितले. या केंद्रांतर्गत सुरू होणाऱ्या वॉर रूममध्ये डोंबिवलीकरांना आवश्यक असणारी सर्व महत्वपूर्ण माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही थरवळ म्हणाले.

तर महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी या एकत्रित राजकीय पुढाकाराचे स्वागत आणि कौतुकही केले आहे. आमची आज सकारात्मक चर्चा झाली असून महापालिका प्रशासनाने या सर्वांची मदत घेण्याचे निश्चित केल्याचेही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले.

दरम्यान सध्याच्या गढूळ राजकीय वातावरणात डोंबिवलीतील राजकारण्यांनी घेतलेला हा पुढाकार नक्कीच स्वागतार्ह असून कल्याणातील सर्वपक्षीय राजकारणी कधी जागे होणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

डोंबिवली सर्वपक्षीय कोवीड मदत केंद्र हे करणार काम

रुग्णवाहिका उपलब्धता / डोंबिवलीतील रुग्णवाहिकांची संख्या

रुग्णालयांमधील बेडची उपलब्धता

ऑक्सिजनची उपलब्धता

लसीकरण केंद्राची माहिती

खासगी रुग्णालयातील बेडची संख्या

इंजेक्शनची माहिती

रक्त आणि प्लाझ्माची उपलब्धता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×