नेशन न्यूज मराठी टीम.
वर्धा / प्रतिनिधी – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले आहे. हे आंदोलन संस्थापक मंत्री अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या आदेशान्वये करण्यात आलेला आहे. वर्धा येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन पार पडले आहे.
ओबीसीच्या आरक्षणावरून मराठा समाज हा आपणास ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे या मागणीला घेऊन आंदोलन करण्यात आले आहे. कुणबींचे प्रमाणपत्र सरसकट देण्यात यावे, अशी मागणी सुद्धा करण्यात येत आहे. याचा विरोध करण्यासाठी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मराठ्याच्या आरक्षणाबाबत निषेध नसून विरोध नसून ओबीसींमध्ये समाविष्ट करण्याचा विरोध असल्याचे सुद्धा यावेळी सांगण्यात आले.