नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – अखिल भारतीय किसान सभा व भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे आमदार कॉम्रेड जीपी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आज चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथून विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी लॉन्ग मार्च काढला आहे.
कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित किमान दोन हजार रुपये आधार भाव निश्चित करून कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवण्याचे धोरण जाहीर करावे, कसणाऱ्यांच्या कब्जात असलेली चार हेक्टर पर्यंतची वन जमीन असणाऱ्यांच्या नावे करून सातबाराच्या कब्जेदार सदरील असणाऱ्यांचे नाव लावावे, सर्व जमीन कसणारा लायक आहे असा शेरा मारावा अ पत्र दावे मंजूर करावेत, शेतकऱ्यांच्या शेतीला लागणारी वीज सलग २४ तास द्यावी, शेतकऱ्यांची थकीत वीज बिले माफ करावीत किंवा सोलर वीज पुरवठा करावा.अशा विविध मागण्यांसाठी घोषणा देण्यात आल्या.
सध्याच्या महागाईचा विचार करून गरीब शेतकरी शेतमजूर कामावर झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांना मिळणाऱ्या प्राधान्य मंत्री आवास योजना व शबरी घरकुल योजनेचे अनुदान एक लाख 40 हजार वरून पाच लाख करावे व वंचित गरीब लाभदारांचा नवीन सर्वे करून त्यांची नावे द च्या प्रत्यक्ष यादीत घ्यावीत. असे ही यावेळी आंदोलन कर्त्यांनी सांगितले. या लॉन्ग मार्च मध्ये मोठ्या संख्येने महिला पुरुष सामील झाले होते.