महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
राजकीय

उल्हासनगर गोळीबार प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार – अजित पवार

NATION NEWS MARATHI ONLINE

धुळे/प्रतिनिधी – उल्हासनगरमध्ये पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबाराची घटना घडली. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबाराची ही घटना घडली आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे, भाजप आमदार गणपत गायकवाडांनी ही गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपा आमदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याचे दिसून आले आहे.

तसेच उल्हासनगर येथील गोळीबारांवरून कुठल्याही लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेण्याचे काही काम नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज धुळ्यात दिली आहे. उल्हासनगर मध्ये झालेली घटना आपण पाहिली असून भाजपा आमदार वैतागलेल्या माणसासारखे तो बोलत होते, संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत, त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही, याची खबरदारी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. मात्र, त्यांच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या असून, रात्री उशिरा त्याबाबत माहिती मिळाली. वास्तविक कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. संविधानानुसार सगळ्यांना नियम आणि कायदे हे सारखेच असतात. कुणाच्या बद्दल काही तक्रार असेल तर मी ती पोलीस स्टेशनला देईल संबंधित घटनेबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत. याबाबत आपण गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुळ्यात व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×