नेशन न्यूज मराठी टिम.
अमरावती/प्रतिनिधी – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची चर्चा ही संपूर्ण जगभर पसरली आहे.शिंदे सरकारची स्थापना झाल्या नंतर काही वेळे नंतर अजित पवार देखील काही राष्ट्रवादी आमदारांना घेऊन सरकार मध्ये सामील झाले आणि अनेकांनी तोंडात बोटे घातली काहीना वाटले ही राष्ट्रवादी मध्ये फूट पडली तर काहींनी प्रतिक्रिया दिली की ही शरद पवार यांची खेळी आहे . तरी पण राष्ट्रवादी मध्ये यानंतर दोन गट तयार झालेले चित्र पहावयास मिळाले. संधी मिळेल तिथे एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. कुरघोडी की जनतेची दिशाभूल येणाऱ्या काळात हे चित्र स्पष्ट होणार आहे
त्यातच अमरावती मध्ये आज अजित पवार गटाची नवचेतना महासभा होणार आहे.अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात येथे नवचेतना महासभा होणार साधारणता दुपारी 3 वाजता महासभे ला सुरुवात होणार आहे.अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल या सभेला मार्गदर्शन करणार आहेत.यादरम्यान या सभेचे बॅनर अमरावती शहरात ठिकठिकाणी लागली आहेत. मात्र या बॅनरवर शरद पवारांचा फोटो गायब झाला आहे.राष्ट्रवादीच्या फुटी नंतर पहिल्यांदा अमरावतीत अजित पवार गटाची महासभा होत आहे.