नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
रत्नागिरी/प्रतिनिधी – केंद्र व राज्य सरकारच्या वाढत्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ ‘आयटक’च्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलतर्फे २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबरपर्यंत कोल्हापूर ते नागपूर संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे.
यात्रेत महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना व जनरल लेबर युनियनने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातही संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रे जिल्ह्यातील विविध संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.