नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
गडचिरोली/प्रतिनिधी – लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी फक्त तीनच दिवस शिल्लक राहिलेले आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांबरोबरच निवडणूक आयोगानेही कंबर कसली असलेल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते आणि काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसन यांच्यात लढत होणार आहे.
गडचिरोली नक्षलवादी भाग असल्याने या भागात निवडणूक अधिकाऱ्यांना भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या 3-एम.आय.- 17 आणि 4-ए.एल.एच. हेलिकॉप्टरच्या मदतीने बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहचिविण्यात आले. मतदानाकरिता लोकसभा मतदार संघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास आज सुरूवात करण्यात आली. गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा 65 मतदान केंद्रावरील 72 निवडणूक पथकाच्या 267 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह आज सकाळी
गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात निवडणूक पथकांना सुरक्षितपणे पोहचविण्यात आले.