नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – पावसाची सध्या परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील काही भाग अजूनही पाण्याअभावी कोरडा राहिलेला दिसून येतोय. अपुऱ्या पावसाने पाण्याचे साठे पुरते न भरल्याने सामान्य जनतेला रोजच्या वापरातील पाण्यासाठी टँकरच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे.
येवला तालुक्यात अजूनही जोरदार पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडेठाक आहेत. यामुळे आजच्या स्थितीला ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्या करीता ग्रामस्थांना पाण्याकरता वणवण करण्याची वेळ येत असल्याने पंचायत समिती द्वारे येवला तालुक्यातील ३२ गावे आणि १५ वाडी-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, ग्रामीण भागातील नागरिकांना टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.