Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
कृषी ताज्या घडामोडी

पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे यासाठी कृषी आयुक्तांचे शेतकरी बांधवांना आवाहन

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे / प्रतिनिधी – कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी दि. ३१ ऑगस्ट २०२३ ही पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.

दि.१ जून ते दि.28 ऑगस्ट या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान 796.8 मिमी असून या खरीप हंगामात दि.28ऑगस्ट 2023 पर्यंत प्रत्यक्षात 675.4 मिमी (दि.28 ऑगस्ट पर्यंतच्या सरासरीच्या 85%) इतका पाऊस पडलेला आहे. खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून दि.28 ऑगस्ट २०२३ अखेर प्रत्यक्षात १39.84 लाख हेक्टर (98 टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. राज्यात पेरणीची कामे पूर्ण झालेली आहेत. आज दि.28 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची 50.28 लाख हे. क्षेत्रावर, कापूस पिकाची 42.08 लाख हे. क्षेत्रावर, तूर पिकाची 11.15 लाख हे. मका पिकाची 9.00 लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाची 14.96 लाख हे. क्षेत्रावर पुनर्लागवड झाली आहे.

राज्यामध्ये दि.25 जुलै 2023 ते आज दि.28 ऑगस्ट 2023 अखेर 484 महसूल मंडळामध्ये 15 ते 21 दिवसांचा तर 376 महसूल मंडळामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला आहे. खरीप हंगाम २०२३ करिता १९.२१ लाख क्विंटल बियाणे गरजेच्या तुलनेत प्राथमिक अंदाजानुसार २१.७८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होते. त्यानुसार राज्यात १९ लाख ७२ हजार १८२ क्विंटल (१०२%) बियाणे पुरवठा झालेला आहे.

खरीप हंगाम 2023 करिता राज्यास 43.13 लाख मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून आतापर्यंत 57.57 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 36.48 लाख मे.टन खतांची विक्री झालेली असून सद्य:स्थितीत राज्यात 21.09 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी.

तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X