Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

भिवंडीत पुन्हा अग्नितांडाव, नारायण कंपाऊंड येथे मोती कारखान्याला भीषण आग

भिवंडी– भिवंडीत आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतांनाच शहरातील नारायण कंपाउंड येथे असलेल्या एका मोती कारखान्याला शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मोती कारखाना जाळून खाक झाला आहे. दरम्यान घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत दोन तासांच्या अथक प्रयत्नात आगीवर नियंत्रण मिळविले आहे. सध्या या ठिकाणी कुलींगचे काम अग्निशमन दलाच्या वतीने सुरु आहे. विशेष म्हणजे हा मोती कारखाना नागरी वस्तीत दाटीवाटीच्या परिसरात असल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

 दरम्यान आगीचे कारण अजूनही समजू शकले नाही . 
  भिवंडीत मोती कारख्यांनासह यंत्रमाग कारखाने , गोदामे , तसेच डाइंग व सायजिंग यांना आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात. मात्र महापालिका व पोलीस प्रशासनासह महसूल विभागाचे देखील या आगिंकडे पुरता दुर्लक्ष होत असून भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल निर्माण झाला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X