Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

केमिकल गोडाऊमध्ये अग्नीतांडव,अग्निशमन दलाच्या ४ गाड्या दाखल

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

गोंदिया/प्रतिनिधी – गोंदिया शहरातील फुलचुर नाक्याजवळ असलेल्या केमिकल गोडाऊनला आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. आधी थोड्याशा लागलेल्या आगिने अचानक भयानक रूप धारण केले. बघता बघता ही आग सर्वत्र पसरली आणि काही क्षणातच गोडाऊमध्ये ठेवलेल्या सामानाची राख झाली. गोडाऊमधून आगीचे लोळ बाहेर पडल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आग मोठी असल्यामुळे अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.

Translate »
X