Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
चर्चेची बातमी महाराष्ट्र

पाणी न आल्यास मनपा कार्यालयाला कुलूप लावण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

चंद्रपूर/प्रतिनिधी – महाराष्ट्रातील अनेक गावे ,मानवी वस्त्या अशा आहेत जिथे आजही पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी नाही. घोटभर पाण्यासाठी काही लोक भर उन्हात पाई चालत अनेक मैल प्रवास करताना दिसतात. कारण प्रशासन आणि शासन यांना त्यांच्या हक्काचे पाणी देण्यास अपयशी ठरत आहे. लोकांचे जीवन सुलभ आणि चांगले बनविण्यासाठी पाणी योजणा राबवल्या जातात. मात्र अनेक वर्षे उलटून गेली तरीही या योजणांपासून सर्वसामाण्य नागरिक वंचित आहे. असाच प्रकार चंद्रपूरमध्ये झाला असून नागरिक रस्त्यावर उतरले.

5 वर्षांपूर्वी मनपाने अमृत योजनेच्या कामाला प्रारंभ केला, त्यानंतर 3 मे 2021 मध्ये तुकूम प्रभागातील सुमित्रा नगर भागात अमृत पाणीपुरवठा योजनेचे उदघाटन करण्यात आले होते. मात्र 3 वर्षाच्या कालावधीत सुमित्रा नगर येथील अमृतच्या पाईपलाईन मध्ये पाण्याचा थेंब आला नाही. ज्या भागात पाईपलाईन गेली त्या भागात पाणी पोहचले नाही. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी याबाबत माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्याकडे तक्रारी केल्या. याबाबत त्यांनी मनपाला वेळोवेळी निवेदने दिली. मात्र निवेदनावर काही कारवाई होत नसल्याने आज 15 मे रोजी सुमित्रा नगर भागातील नागरिकांना सोबत घेत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी मनपाचे अधिकारी आंदोलनात पोहचले त्यांनी आंदोलन कर्त्यांना येत्या 10 दिवसात आपल्या भागात नियमित पाण्याचा पुरवठा सुरू होणार असे आश्वासन दिले. यावेळी माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की “10 दिवसात या भागात जर पाणी आले नाही, तर आम्ही सर्व नागरिक मनपा कार्यालयात पोहचत मनपाला कुलूप लावल्याशिवाय राहणार नाही.” आंदोलनानंतर सुमित्रा नगर भागातील आंदोलनकर्ते नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली, आंदोलनादरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X