नेशन न्यूज मराठी टीम.
उस्मानाबाद / प्रतिनिधी – मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मनोज जरंगे यांचे उपोषण सुरू असून त्यास पाठिंबा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही मराठा बांधव सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत . काल पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी उपोषणस्थळी भेट दिली तेव्हा काही कार्यकर्त्यांनी विरोधी घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती .
यावेळी सावंत यांनी सहा तासात चांगला निर्णय दिसेल नाही आल्यास स्वतः रस्त्यावर उतरू असे म्हटले होते परंतु अजून निर्णय नाही म्हणून अमोल जाधव व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत बांगड्या चोळी आहेर देऊन पा. तानाजी सावंत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले व राजीनाम्याची मागणी केली .आरक्षण न मिळाल्यास हिंस्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी दिला .