नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – अपुऱ्या पावसाने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आत्महत्या प्रमाण वाढले आहे. पिक विमा मिळावा म्हणून शेतकरी आंदोलन करीत आहेत. सातबारा नावावर नसल्याने देखील कष्टकरी शेतकऱ्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर आजपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, त्यांच्या शेतामध्ये पिके देखील उभी आहेत मात्र सरकारने ई पीक पाहणी साठी घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार आमच्या शेतकऱ्याकडे सातबारा नसल्यामुळे त्यांच्या पिकांच्या नोंदी होत नाहीत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने अशा शेतकऱ्यांच्या शेती स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून त्याच्या नोंदी सरकारकडे सादर कराव्या अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.