नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – शासनाने सर्वांसाठी घरे असे धोरण जाहीर केले आणि तसा शासनाने निर्णय देखील काढला मात्र त्यानंतर देखील शेकडो आदिवासी कुटुंब घरकुल योजने पासून वंचित आहेत. म्हणून एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त यांच्याकडे शबरी घरकुल योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थींना मिळावा अशी मागणी केली गेली.
13 जून 2023 रोजी डॉ विजयकुमार गावीत आदिवासी विकास मंत्री यांच्या दालनात झालेल्या बैठकीत त्यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना आदेश दिले की ,जे पात्र लाभार्थी असतील त्यांचे सर्वांचे प्रस्ताव स्वीकारा. यांनतर इगतपुरी तालुक्यातील आदिवासी व आदिम कातकरी कुटुंबाचे शेकडो प्रस्ताव कार्यालयात दाखल केले मात्र आजही प्रस्ताव मंजुरीसाठी आदिवासी विकास विभागाकडे पाठविण्यात आले नाहीत.
त्यावर काही निर्णय झाला नाही म्हणून आदिवासी विकास मंत्री यांच्या शासकीय निवास्थानी बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन केले गेले होते. आजही इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बेघर कुटुंब त्यांच्या हक्काच्या घरकुल पासून वंचित आहेत. या सर्व पात्र लाभार्थींना तात्काळ शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून मोर्चाने येऊन निवेदन सादर करत आहोत जो पर्यंत सर्व प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. असे आंदोलनकर्त्यानी सांगितले.
इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बेघर कुटुंब यांनी दाखल केलेले प्रस्ताव तात्काळ मजूर करण्यात यावे. ज्या पात्र लाभार्थींना जागा नाही ती जागा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार कराव्यात यावा. जिल्हा परिषद कडून व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी आपणास दिलेल्या आदेशा नुसार आहेत तसे प्रस्ताव पाठवावे. जातीचे प्रमाणपत्र नाही म्हणून जे प्रस्ताव पाठवले नाहीत ते ताबडतोब पाठवावेत. या मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा यावेळी एल्गार कष्टकरी संघटने कडून देण्यात आला.