नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
धुळे/प्रतिनिधी – राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी 25 ऑक्टोबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आलं असून आजपासून धरणे आंदोलन आणि विविध आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धुळे शहरातील क्युमाइन क्लब येथे धरणे आंदोलन करण्यात आले.धुळे शहरातील क्युमाइन क्लब येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी समायोजन कृती समितीने आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर झाला असून या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे तसेच समान काम, समान वेतन या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. मागील पंधरा वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी आणि अधिकारी अतिशय तूटपूजा मानधनावर काम करीत असून त्यांना कायम करण्यात यावे. कोरोनाच्या काळात या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले पूर्ण योगदान दिले असून आम्हाला शासकीय सेवेत कायम करून न्याय मिळवून द्यावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे.