नेशन न्यूज मराठी टिम.
डोंबिवली/प्रतिनिधी – जालन्यात मराठा समाजातील उपोषण कर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता.यानंतर आक्रमक झालेल्या मराठा समाजाकडून संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले, तसेच सरकारचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीत देखील सकल मराठा समाजकडून आक्रमक पवित्रा घेत जालन्यामध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे आणि मराठा समाजातील बांधवांवर घालण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली. या समयी मोठ्या संख्येंने नागरिक उपस्थित होते.