नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनिधी – ‘धोंडी धोंडी पाणी दे, अक्कलपाड्याच पाणी धुळ्याला मिळू दे’ असे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने धोंडीची संबळ वाद्यासह शहरातून मिरवणूक काढली. महानगर प्रमुख धीरज पाटील व विभाग प्रमुख सागर निकम यांनी डोक्यावर धोंडी मिरवली. झासी राणी पुतळा, आग्रारोडमार्गे महापालिकेच्या प्रवेशव्दारासमोर मनपा प्रशासन व भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी तसेच वरूण राजाला साकडे घातले. या अनोख्या आंदोलनामुळे धुळेकरानचे लक्ष वेधून घेतले होते.
शहरासह जिल्ह्यात दोन महिन्यात २५ टक्के सुध्दा पाऊस झालेला नाही. त्यामुळे नकाणे व डेडरगाव तलाव पाण्याअभावी कोरडे ठाक झाले आहेत. या दोन तलावातुन शहराच्या अर्धा भागाला पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळे आगामी काळात शहरात भिषण पाणी टंचाईला सामारे जावे लागणार आहे. एकीकडे ही परिस्थिती असतांना साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे लाटीपाडा, जामखेली, मालनगाव धरण भरल्यामुळे अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात चांगला जलसाठा निर्माण झाला आहे. धुळे महापालिकेच्या माध्यमातून धुळे शहराचा पाणी प्रश्न सुटावा, याकरीता अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना पुर्ण होऊन पुढल्या आठवड्यात शहराला दिवसाआड पाणी मिळेल, अशी घोषणा सत्ताधारी भाजपा कडून विद्यमान खा. डॉ. सुभाष भामरे यांच्या वतीने करण्यात आली होती.
गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने धुळेकर जनता आज-उद्या- परवा करत अक्कलपाडा योजनेचे पाणी कधी मिळेल, या प्रतिक्षेत धुळेकर नागरिक आहे. ही प्रतीक्षा लवकर संपावी म्हणून आज शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने करीत अनोखे आंदोलन करण्यात आले.