नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव/प्रतिनिधी – नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना तृतीयपंथीयांचा अपमान होईल असं वक्तव्य केल्याने त्यावरून राज्यभरातले तृतीयपंथी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे .नितेश राणे यांच्याविरुद्ध तृतीयपंथी यांनी पुण्यात आंदोलन केल्यानंतर जळगावातील धरणगावात सुद्धा तृतीयपंथी यांनी नितेश राणे यांच्याविरोधात आंदोलन करत त्यांचा निषेध व्यक्त केला आहे
शिवसेना ठाकरे गट व तृतीयपंथी यांच्यावतीने धरणगाव शहरात नितेश राणे यांच्या प्रतिमेबरोबरच भाजपचे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रवी राणा यांच्या प्रतिमांना तृतीयपंथी यांच्यावतीने जोडे मारून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला
नितेश राणे हाय हाय, रवी राणा हाय हाय या शब्दात घोषणाबाजी करत भाजप नेत्यांचा निषेध करण्यात आला.
नितेश राणेंनी अत्यंत चुकीचे वक्तव्य केले आहे. नितेश राणे यांनी आमच्यासारखा जन्म घेऊन आमच्यासारखा साडी घालून बघावं, आमच्यासारखा टाळ्या वाजून बघावं तेव्हा समजेल की तुम्ही गिधाड आहात असं आमच्याबद्दल अपमानजनक बोलणार यांचा निषेध असो, धिक्कार असो या शब्दात तृतीयपंथी यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.