नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
जळगाव/प्रतिनिधी – कोरोना काळात राज्यातील अनेक विद्यापीठांकडून ऑनलाईन एमसीक्यू पद्धतीने विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या. अजूनही हा नियम अनेक विद्यापीठांमध्ये राबवला जात होता. पण आता विद्यार्थ्यांचा विचार करून रेमेडियल ऑनलाईन एमसीक्यू परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जळगाव जिल्ह्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठाने घेतला आहे. परंतु हा निर्णय रद्द करू नये अशी मागनी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. विद्यापीठाच्या निर्णयाविरुद्ध विद्यार्थ्यांनी जळगावातील शिवतीर्थ मैदानावर आंदोलन केले.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या हजारों विद्यार्थ्यांचे रेमेडियल नियम रद्द केल्यामुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हा नियम रद्द करू नये अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. रेमेडियल ऑनलाईन एमसीक्यू परीक्षा पुन्हा चालू करावी ही परीक्षा बंद करणे हा फक्त विद्यार्थ्यांचा शोषणाचा नियम विद्यापीठाने बनविला आहे. त्यामुळे या नियमाला स्थगिती मिळावी अशी विनंती यावेळी विद्यार्थ्यांनी केली. रेमेडियल हा नियम बंद होण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.