नेशन न्युज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – मुंबई काँग्रेसच्या वतीने मणिपूर मध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि संभाजी भिडे यांचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कुलाबा ते गेट ऑफ इंडिया इथपर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांच्या दबावामुळे ते कॅन्डल मार्च करू दिले नाही.
त्यामुळे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते वर्षा गायकवाड यांच्यासोबत मुंबई काँग्रेस कार्यालय पासून ते सी एस टी एम स्टेशनच्या बाहेर पर्यंत निषेध म्हणून मशाल आंदोलन केले.यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Related Posts