नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती/प्रतिनिधी – राज्य सरकारने खाजगी कंपनीच्या माध्यमातून कंत्राटी नौकरभरतीचा निर्णय घेतला आहे. तो रद्द करण्यात यावा, तसेच सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना विकण्याचा शासन निर्णय मागे घ्यावा, यासाठी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून चक्क तिवसा तहसील कार्यालयावर राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.
यावेळी तिरडीवर सरकारचा प्रतीकात्मक पुतळा झोपवत, ती तिरडी तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आली. यावेळी ज्या प्रमाणे मयतावर अंत्यसंस्कार करण्यात येते तशीच प्रेत यात्रा काढून यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला व त्यानंतर राज्य सरकारच्या काढण्यात आलेल्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.