नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – मनसेने फेरीवाला विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापालिका प्रशासनाला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम मनसेने दिला होता. काल डोंबिवली स्टेशन परिसरात मनसेने डेडलाईन संपली आता दुर्लक्ष करा. असे बॅनर लावले होते. त्यानंतर आज महापालिकेने फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत रस्ते मोकळे केल्याचे पाहायला मिळाले.
आज मनसे आमदार राजू पाटील फेरीवाल्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी डोंबिवली स्टेशन परिसराची पाहणी करत प्रभाग अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. कारवाई बाबत अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण ऐकताच संतापलेल्या आमदार राजू पाटील यांनी “घंटा करता तुम्ही , आता हप्त्याची लाईन काढून दाखवू का ? कोण हप्ते गोळा करतात ते दाखवू का ? राजीनामा द्याल का ? लगेच बोलवतो. कोण किती घेतो नंतर कसं वाटप होतं , बोलवू का अशा शब्दात अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.मनसे फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झाल्याने निदान आज तरी डोंबिवली स्टेशन परिसराने घेतला मोकळा श्वास घेतला ही गोष्ट नक्की.पालिका किती दिवस कारवाई करते हे येणाऱ्या दिवसात बघायला मिळेलच.