महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
मनोरंजन

लॉकडाऊन नंतर कल्याण आचार्य अत्रे रगंमंदिर मध्ये नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची दमदार सुरुवात

कल्याण – कोरोना पार्श्वभूमीवर लाँकडाऊन नंतर तब्बल नऊ महिन्यानंतर कल्याणातील आचार्य अत्रे रगंमंदिराची दारे नाट्य रसिक प्रेक्षक वर्गासाठी शनिवारी दुपारी साडे चारच्या सुमारास ‘तु म्हणशील तसं’ या नाटकाच्या पहिला वहिला शुभारंभ प्रयोगाने उघडण्यात आली. मुंबई ठाण्या पाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील नाट्यगृह खुली करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी नुकताच घेतला होता.            
आयुक्तांच्या या निर्णयानंतर शनिवारी कोरोना लाँकडाऊन संकटाच्या तब्बल नऊ महिन्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले निर्मित, प्रसाद ओक दिग्दर्शित आणि संकर्षण कऱ्हाडे व भक्ती देसाई अभिनित ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाने अत्रे रंगमंदिर येथुन सुरूवात झाली. शनिवारी होणाऱ्या या पहिल्या नाटकाच्या प्रयोगासाठी अत्रे रंगमंदिर सज्ज करण्यात आले होते. कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून नाट्यप्रयोग सुरू करण्यात आला तर २० डिसेंबरला डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहं देखील पुन्हा नाट्य रसिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्रे रंगमंदिरातील आसनव्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले असून एक खुर्ची सोडून एक प्रेक्षक बसेल अशाप्रकारे बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रयोगानंतर नाट्यगृह सँनिटायज करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त डाँ. विजय सूर्यवंशी सपत्नीक शनिवारी ‘तू म्हणशील तसं’ या नाटकांच्या शुभारंभाच्या प्रयोगाला उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्त डाँ विजय सूर्यवंशी म्हणाले की, नऊ महिनाच्या प्रतिक्षेनंतर नाट्यगृहाचा  पडदा उघडणारे आचार्य अत्रे  रगंमंदिर एम्एम्आर् रिजन मधील पहिले नाट्य गुह असुन ‘तू म्हणशील तसं’ या नाट्य प्रयोगाचा शुभारंभ कोरोना लाँकडाऊन नंतर सुरू झाल्यामुळे या नाटकाची इतिहासात नोंद होईल. नियमांचे पालन करीत नाट्य रसिक प्रेक्षकांनी नाटकांचा आनंद घ्यावा. या दरम्यान नाट्य प्रयोग सुरु होण्याआधी नाटकातील मुख्य कलाकार संकर्षण कह्राडे यांनी आयुक्तांना पुष्प गुच्छ देत आयुक्ताचे आभार मानले. यावेळी अत्रे रंगमंदिराचे प्रभारी व्यवस्थापक माणिक शिंदे, सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे प्रभारी व्यवस्थापक दत्तात्रय लदवा यांच्यासह  कर्मचारी वर्ग उपस्थित होता. हा पहिला वहिला नाट्य प्रयोग बघण्यासाठी सर्व नियमांचे पालन करत रसिक प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती.

Related Posts
Translate »