नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी व विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपाने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. कल्याणात लोकसभेसाठी डॉ. श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी आप आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केलेली दिसत आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी विरोधी पक्षातील उमेदवार श्रीकांत शिंदे यांची मिमिक्री करत त्यांच्यावर निशाणा साधला होता त्यावर आता कल्याणात आपल्या प्रचारादरम्यान श्रीकांत शिंदे यांनी वैशाली दरेकर यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले “वैशाली दरेकरांची चुकी नाही त्या या ठिकाणी उभ्या राहिल्या आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. जसा बॉस वागतो आणि शिकवतो तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना करावे लागते. वैशाली दरेकर यांनी आता प्रत्येक सभेत मिमिक्री करायचे काम धंदे सुरू केले आहेत. निवडणुका संपल्यानंतर त्यांच्याकडे मिमिक्रीचे काम उरणार आहे” असा टोला श्रीकांत शिंदेंनी आपल्या विरोधक वैशाली दरेकर यांना लगावला.
शिक्षकांच्या सुरू असलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले “शिक्षकांच्या काही समस्या आहेत. आचारासंहिता संपल्यानंतर यावर बैठका घेतल्या जातील.समस्या सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे” शिक्षकांना मतदानाविषयी जनजागृती करण्याचे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी करण्यास सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागांनबद्दल श्रीकांत शिंदे म्हणाले “ लोकसभेच्या जागेचा तिढाही राहिलेला नाही. दोन दिवसांत जागा जाहीर होतील”