नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण ग्रामीण : प्रतिनिधी
ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या संदप गावातील शाळेचा वीजपुवठा गेल्या १५ वर्षांपासून खंडित करण्यात आला होता.वीज बिल न भरल्याने महावितरण कडून वीज मीटर काढण्यात आपले होते. मात्र संदप गावातील समाजसेवक संदीप पाटील आणि ऍड तृप्ती पाटील यांनी जिल्हा परिषदेची सुरु असलेली वाटचाल वाटचाल हि आमदार राजू पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर तातडीने आमदार राजू पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या पगारामधून थकलेले वीज बिल आपल्या सहकाऱ्यांच्या मार्फत भरून स्वतंत्र दिनाच्या पूर्व संध्येला शाळा प्रकाशमय केली आहे.
कल्याण ग्रामीण भागातील संदप गावातील ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण हे अंधारात सुरु होत. शाळेचे थकलेले वीज बिल हे अधिकचे थकल्यामुळे महावितरण कडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. गेल्या पंधंरा वर्षांपासून विद्यार्थी अंधारात शिक्षण घेत होते. आजूबाजूच्या ग्रामस्थांकडून देखील वीजपुरवठा केला जात होता. मात्र विद्यार्थ्यांना अंधारात शिक्षण घेण्याची वेळ आली असल्याची माहिती गावातील शिक्षण प्रेमी संतोष पाटील आणि ऍड. तृप्ती पाटील यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिली होती. या नंतर तातडीने आमदार पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या पगारामधून आपले पक्षातील सहकारी योगेश पाटील(संदप),प्रवीण पाटील यांच्या माध्य्मातून थकलेल्या बिलाच्या रकमेचा धनादेश महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला होता. वीज बिलाची थकबाकी भरल्यानंतर तातडीने महावितरणकडून रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील ठाणे जिल्हा परिषदेचा वीज पुरवठा सुरळीत करून दिला आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून अंधारात असलेली संदप गावातील ठाणे जिल्हा परिषदेची शाळा यंदा स्वतंत्र दिनानिमित्त प्रकाशमय झाली आहे. सुट्टीच्या दिवशी देखील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवल्यामुळे शिक्षण प्रेमी संतोष पाटील,ऍड तृप्ती पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे स्वागत करत आमदार राजू पाटील यांचे आभार व्यक्त केलं आहे.
ठाणे जिल्हा परिषदेकडून जिल्हापरिषदेच्या वीज बिलांच्या थकबाकी संदर्भात किंवा नादुरुस्तीबाबत योग्य ती दखल घेतली जात नसल्याने त्याच्या त्रास हा विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. ठाणे आणि डोंबिवली शहरांच्या मध्ये असलेल्या या संदप गावातील हे प्रकार देखील त्याचेच उदाहरण आहे. त्यामुळे अश्या वीज बिलांच्या थकबाकी संदर्भात ठाणे जिल्हा परिषद कधी सतर्क होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.