महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image क्रिडा चर्चेची बातमी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते साहसी जलतरणपटू नील शेकटकरचा सत्कार

मुंबई/प्रतिनिधी – एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे १५ किलोमीटरचे अंतर अकरा वर्षाच्या नील सचिन शेकटकर याने अवघ्या दोन तास पंचेचाळीस मिनिटात पोहून पार केले. त्यांच्या या जलतरण विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. नील शेकटकरच्या या साहसी जलतरण कामगिरीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्याचा सत्कार करुन कौतुक केले.मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या दालनात नील शेकटकरचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीलच्या जलतरण कामगिरीचे कौतुक केले. तज्ज्ञ प्रशिक्षकाकडे पुढील प्रशिक्षण घेऊन जलतरण क्षेत्रात आणखी दमदार कामगिरी करत व्यावसायिक स्पर्धेत भाग घेत राज्याचे, देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला केले. नीलसह त्याच्या प्रशिक्षक, पालकांचेही अभिनंदन करत उपमुख्यमंत्र्यांनी त्याला जलतरण क्षेत्रात उज्ज्वल कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×