महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
पर्यटन लोकप्रिय बातम्या

साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्यांनी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे आवश्यक

नेशन न्युज मराठी टीम.

ठाणे – कोकण विभागात जमीन, हवा, पाणी यावर साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्या अथवा नवीन उपक्रम सुरू करू इच्छीणाऱ्या सर्व संस्था-व्यक्तींनी साहसी पर्यटन उपक्रमाची नोंदणी पर्यटन संचालनालयाकडे करावी, असे आवाहन कोकण विभागाचे पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी केले आहे. ही नोंदणी पर्यटन विभागाच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन करण्याची सोय असल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्रात साहसी पर्यटन उपक्रमांना चालना देणे तसेच विविध साहसी उपक्रम आयोजक आणि साहसी उपक्रमांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांनी नोंदणी, विनियमन, सनियंत्रण इत्यादी बाबत राज्य शासनाचे साहसी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार जमिन, हवा आणि पाणी यावर साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्या संस्था यांच्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सुचना तयार करण्यात आल्या असून त्यानुसार त्यांनी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

पर्यटन संचालनालयाने साहसी पर्यटन उपक्रमांच्या नोंदणी करण्याची कार्यपध्दती सुरू केली असुन www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर Menu- Registration Forms-Adventure Registration यावर Click करुन ऑनलाईन अर्ज व आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन नोंदणी करता येणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालय उपसंचालक (पर्यटन), प्रादेशिक कार्यालय कोकण भवन, सीबीडी बेलापुर, नवी मुंबई किंवा पर्यटन संचालनालयाचे नरीमन भवन, 156/157, 15 वा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई-21 येथे संपर्क साधावा, असे श्री. हेडे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×