नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – बाप्पाचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी कोकण वासी मोठ्या संख्येने कोकणाकडे रवाना होतात. या भक्तांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी एसटी महामंडळ, रेल्वे यास खाजगी बसेस द्वारे प्रवाशांना वाहन सुविधा उपलब्ध करून दिली जाते. अनेक राजकीय नेते आपल्या मतदारांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देतात यासाठी एसटीच्या बसेस चा ग्रुप बुकिंग केलं जातं.
कल्याण आगारातून दरवर्षी राजकीय पक्ष किमान तीनशेहून अधिक बसेसचे भक्तांसाठी बुकिंग करत या बसेस प्रवाशांना मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. यंदा मात्र आतापर्यंत केवळ वीज बसेसचे बुकिंग झाले असून अनेक राजकीय पक्षांनी ग्रुप बुकिंग साठी विचारणा केली आहे. मात्र अद्यापी बुकिंग झालेली नाही तर 44 मार्गांवर धावणाऱ्या बसेस आगाऊ बुकिंग प्रवाशांकडून फुल झाले आहे अशी माहिती कल्याण आगर व्यवस्थापकांनी दिली.
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी यंदा रेल्वेने देखील दरवर्षीच्या तुलनेत जादा गाड्या उपलब्ध करून दिल्या असून खाजगी बसेस चालकांनी कंबर कसली आहे. तर विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून एक सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग विमानतळावर मुंबई ते सिंधुदुर्ग विमान सेवा चालवली जाणार असून मोठ्या संख्येने बाप्पाचे भक्त विमान प्रवासाला प्राधान्य देण्याची शक्यता आहे.